Maharashtra Assembly Elections

Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

Kudal Vidhan Sabha Exit Poll 2024 : कुडाळ मतदारसंघातून शिंदे गट बाजी मारणार असल्याची चित्र दिसत आहे.

Manasvi Choudhary

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २३ तारखेला मतमोजणी होईल. अशातच आता सकाळ समूहाचा एक्झिट पोल हाती आला आहे. कुडाळ मतदारसंघातून शिंदे गटाची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण निलेश राणे यांनी जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे.

कुडाळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरूद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढाई होती. निलेश राणे यांच्याविरोधात वैभव नाईक आहेत. यातच आता कुडाळ मतदारसंघात शिंदे गटाचे पारडं जड असल्याचं चित्र दिसत आहे. निलेश राणे हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे.

कुडाळ मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडलं. यावेळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दरम्यान, कुडाळ मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणेंनी भाजपला राम राम करत शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत निलेश राणे भाजप या पक्षात होते. कुडाळ मतदारसंघात निलेश राणे यांच्याविरोधात वैभव नाईक हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT