Ajit Pawar News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का, चेतन तुपेंच्या अडचणी वाढल्या; हडपसरमधील 5 नगरसेवक साथ सोडणार

Ajit Pawar Election News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का बसला आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात अजित पवार यांचे पाच नगरसेवकांनी साथ सोडली आहे.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे साथ सोडणार आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजतेय.

विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत.

सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे. हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार आहेत. मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT