Maharashtra Political Crisis:  saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंची मोठी खेळी, आनंद दिघेंच्या वारसदाराला तिकीट?

Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी मास्टरप्लान आखलाय. केदार दिघेंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद आहे, त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्रव्यूह रचलेय. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच अडकवण्यसाठी ठाकरेंनी हा प्लॅन आखल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना एबी फॉर्म दिलाय, ते पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंनीही त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत जिल्हा अध्यक्षपद दिले. केदार दिघे यांनी लोकसभेला ठाकरेंसाठी शंभर टक्के काम केले. केदार दिघे यांना आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या विरोधात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

ठाकरेंचा मास्टरप्लान , शिंदेंना घेरणार -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात शिंदेंचे मोठं वर्चस्व आहे. याच वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी ठाकरेंनी व्युहरचना आखली आहे. कोपरी पाचखाडी मतदारसंघात केदार दिघे यांचं तिकीट निश्चित मानले जात आहे. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे असा सामना होईल. मिळालेल्या माहितीनुसार, केदार दिघेंनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात ठाकरेंकडे उमेदवारी मागितली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार दिघेंना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवार दिली जाईल. तर ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT