Maharashtra Election Maharashtra Election
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : संजय राऊतांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, शिंदेंसेनेच्या उमेदवाराबद्दलचं वक्तव्य भोवलं!

Sanjay Raut : संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांच्या बद्दल वक्तव्य भोवले.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमदेवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य सुनील राऊत यांना भोवले आहे. सुनील राऊत यांच्याविरोधात सोमवारी रात्री विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय, प्रचारावेळी सुनील राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्या केले. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरा करंजे यांच्या तक्रीरीनंतर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

विक्रोळी विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे भाऊ महाविकास आघाडीचे विक्रोळी चे उमेदवार सुनील राऊत यांना महागत पडले आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात याबाबत कलम ७९, ३५१(२), ३५६(२) बीएनएस अंतर्गत रात्री उशिरा करंजे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी सुनील राऊत यांनी टागोर नगर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार करंजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना, हिंदीमध्ये ते म्हणाले की, जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले मे डाल दी, अभी २० तारीख को काटेंगे बकरी को असे आक्षेपार्ह विधान केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. करंजे यांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास कऱण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT