Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा? Saamtv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

Maharashtra Assembly Election : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कोण सरस ठरणार यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कोण किंगमेकर ठरणार?

Tanmay Tillu

Maharashtra Assembly Election 2024 : मविआ आणि महायुतीत विधानसभेचा सामना रंगला असला तसाच सामना महायुतीत किंगमेकर कोण ठरणार यावर घमासान सुरू झालंय. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कोण सरस ठरणार यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कोण किंगमेकर ठरणार यावरचा हा विशेष रिपोर्ट....

राज्यात महायुतीच्या नेत्यांचा जसा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. तसा महाविकास आघाडीचाही. आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फार सख्य असल्याचे दिसत नाही. तर तिकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेचेही तसेच होताना दिसतय..या खेळात राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री त्यांचाच होणार, असं दिसतंय. तसे संकेतही अमित शाहांनी दिले आहेत.

मात्र शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील, यावर दोन्ही पक्षांचे वजन ठरेल. त्यामुळे किंगमेकर व्हायचं तर आपापल्या पक्षाचं वजन शिंदे आणि अजितदादांना वाढवावं लागेल. त्यामुळे मविआपेक्षा शिंदे आणि अजितदादांमध्येच जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी खरी स्पर्धा आहे. त्यामुळे मोठा भाऊ असलेल्या भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार यासाठी दोघांमध्ये जोरदार चुरस असणार आहे. जागावाटपासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीत खडाखडी असल्याचं दिसून येतंय.

महायुतीत किंगमेकर कोण ?

- जागावाटपात कमी जागा अजितदादांना

- शिंदेंच्या अनेक इच्छुकांकडून राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी

- शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून अजित पवारांवर वारंवार टीका

- हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर अजित पवारांच्या नेत्यांकडून शिंदेंवर टीका

उद्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री भाजपचा होणार यात शंका नाही. खरी रस्सीखेच शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात होणार आहे. त्यामुळे दोघांच्या रस्सीखेचीत भाजप घवघवीत यश मिळवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं...त्यामुळे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीत किंगमेकर कोण ठरणार यावर त्या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT