Maharashtra Assembly Elections

Assembly Election: बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Hitendra Thakur: विधानसभा निवडणुकीच्या हितेंद्र ठाकूर यांचा आणि त्यांच्या पुत्र क्षितीज ठाकूर यांचा दारूण पराभव झालाय.

Bharat Jadhav

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का बसलाय. ३५ वर्ष एक हाती सत्ता असलेल्या वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही सीट पडल्या आहेत. वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालाय, भाजपच्या स्नेहा दुबे- पंडित आणि नालासोपारा विधानसभेत क्षितीज ठाकूर यांचा पराभव भाजपचे राजन नाईक यांनी केला. तर बोईसर विधानसभेत विद्यमान आमदार राजेश पाटील हे पराभूत झालेत तर तेथे शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे हे विजयी झालेत.

हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसईचे आमदार होते. तसंच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत. पालघर हा त्यांचा बालेकिल्ला असून त्यांची जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. ते 1988 पासून राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेसमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. नंतर 1990 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी पालघर जिल्ह्यातील वसई-विरारचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. पण नंतर त्यांनी स्वत:चा वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.

हितेंद्र ठाकूर यांनीच भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरार येथील हॉटेलमध्ये पैशांसोबत पकडलं होतं. ठाकूर यांनीच विनोद तावडे यांना पैसे वाटण्यासंदर्भात जाब विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT