beed mohan jagtap news beed mohan jagtap news
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : बीडमध्ये भाजपला मोठा धक्का, दिग्गज नेत्याने बंड पुकारले, राजकीय गेम केल्याचा आरोप!

Beed Politics News : बीडमधील पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मोहन जगताप वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच महायुती आणि मविआमधील अतंर्गत गटबाजी समोर येत आहे. भाजपला याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसतेय. मित्रपक्षाला मतदारसंघ सुटल्यामुळे काही आमदारांनी वेगळी वाट धरण्याचा विचार केला आहे. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी नवरात्रीमध्ये निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. आता बीडमधील भाजप नेत्याने बंडाचे निशाण फडकावले आहे. मोहन जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.

बीडमधील भाजप नेते मोहन जगताप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय भाजपवर गंभीर आरोपही केले. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला. ब्लॅकमेलिंग केलं आणि माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार, असे स्पष्ट मत मोहन जगताप यांनी व्यक्त केलेय.

मोहन जगताप यांचा भाजपवर मोठा आरोप -

राजकारणात थापा मारणं आणि लबाड बोलणं सुरु आहे. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला, ब्लॅकमेलिंग केलं अन माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार आहे, असे मोहन जगताप म्हणाले.

पंकजा मुंडे यांना धक्का

पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून मोहन जगताप यांची ओळख आहे. सध्या ते भाजपचे माजलगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पण विधानसभा निवडणुकीआधीच मोहन जगताप यांनी बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितलेय.

... तर माझं नाक कापून टाकेल -

पक्षाचे तिकीट मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र मी तुमच्या तिकिटावर उभा राहणार आहे. काही टगे इकडे तिकडे फिरून तिकीट न मिळण्याचा प्रयत्न करतील. मात्र मी उभा राहणार आहे. तुम्हाला जर 10 टक्के घेणारा आमदार पाहिजे असेल तर मी हात जोडतो, अन्यथा मला साथ द्या, असे मोहन जगताप म्हणाले.

मी टक्केवारी घेणार नाही, जर मी चांगला आमदार म्हणून नाही राहिलो, तर माझं नाक कापून टाकील. त्यामुळं मी तुमच्या जीवावर नशीबासोबत मी संघर्ष करेल, असे वक्तव्य मोहन जगताप यांनी केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT