file photo
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: विधानसभेसाठी वंचितची रणनीती; प्रकाश आंबेडकरांच्या खेळीनं मविआत चलबिचल ?

Assembly Election: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या मागणीला तीव्र विरोध केला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीनं नवा प्लॅन आखलायं...काय प्लॅन आहे पाहूया

Tanmay Tillu

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आता विधानसभा निवडणुकीत ओबीसी,आदिवासींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतायत..लोकसभेला मराठा आंदोलनाचा फटका वंचितलाही बसला. या अनुभवातून वंचितने आता नवी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यानुसार वंचित आदिवासी,मुस्लिम आणि ओबीसींना एकत्रित करणार आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासाठी बोलणी सुरु केली होती. ठाकरे गटासोबत वंचितची आघाडी पुढच्या टप्प्यांवरही गेली. मात्र जागावाटपावरुन बोलणी फिस्कटली आणि दोघांची फाटाफूट झाली. आता आंबेडकर नव्या समीकरणांसह विधानसभेला मैदानात उतरताना पाहायला मिळतायत. वंचितचा काय प्लॅन आहे पाहूया.

विधानसभेला वंचितची रणनीती

प्रकाश आंबेडकरांकडून ओबीसींना अधिकाधिक जागा देण्याचं प्लॅनिंग

ओबीसींना जागा देत थेट शरद पवारांना आव्हान

वंचित आदिवासी आणि ओबीसींना एकत्रित करणार

आदिवासींना अनारक्षित जागेवर लढवणार

वंचितच्या दुस-या यादीत सर्व 10 उमेदवार मुस्लीम

मराठा आंदोलनाचा फटकाही वंचितला बसला. या अनुभवातून वंचितने आता नवी मोट बांधायला सुरुवात केलीये.. त्यानुसार विधानसभेचं प्लॅनिगं केलं जातंय.यासाठी एक नवी आघाडी तयार केली जात असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या नव्या प्रयोगानं मविआचं टेन्शन वाढणार आहे,लोकसभेत मविआला वंचित फॅक्टरचा चार जागांवर फटका बसला.

वंचितचा प्लॅन, मविआला घाम ?

वंचितमुळे आघाडीला चार जागांवर फटका

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना 2 लाखांहून अधिक मतं, काँग्रेसच्या अभय पाटलांचा पराभव

बुलढाण्यात वंचित उमेदवाराला 98 हजार मतं, ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर पराभूत

हातकणंगलेमध्ये वंचित उमेदवाराला 32 हजार मतं, ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा पराभव

वायव्य मुंबईत वंचित उमेदवाराला 10 हजार मतं, ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा 48 मतांनी पराभव

प्रकाश आंबेडकरांसाठी आगामी विधानसभा निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा तुटलेला जनाधार आणि कमी झालेली मतं विधानसभेत मिळवली तरच त्यांची पुढची राजकीय वाटचाल सुखकर होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या मनात असलेल्या दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मायक्रोमायनॉरिटी या आघाडीचा त्यांना त्यांच्या पक्षाला फायदा होणार की मविआला फटका बसणार ? हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT