Maharashtra Election 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: एकाच घरात दोन पक्ष !; कुठे पिता-पुत्र, तर कुठे काका-पुतण्यामध्ये लढत, कोण मारणार बाजी?

Maharashtra Election : यंदाची विधानसभा निवडणूक ही खूप रोचक होणार आहे, कारण एकाच घरात दोन उमेदवार आहेत. तेही दोघेही वेगवेगळ्या पक्षात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झालीय. मात्र यंदाच्या विधानसभेत एक घर दोन पक्ष हा नवा ट्रेंड पहायला मिळतोय..या ट्रेंडमध्ये कोणते नेते आहेत? त्याबरोबरच राजकारणातील घराणेशाहीवरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत सत्ता घरातच राखण्यासाठी राज्यात नवा ट्रेंड सुरु झालाय..उमेदवारीसाठी सख्खे नातेवाईक कुठे मित्रपक्षात तर कुठे विरोधकांच्या तंबूत दाखल झालेत. आतापर्यंत वडील आणि मुलगा, भाऊ-भाऊ यांच्यानंतर आता उमेदवारीसाठी काका-पुतण्या वेगवेगळ्या पक्षातून लढण्याची चर्चा रंगलीय.. मात्र या नव्या ट्रेंडमध्ये सहभागी झालेले नेते कोण आहेत? पाहूयात.

सात पिढ्या सत्ता घरात

बेलापूरमधून उमेदवारीसाठी भाजप नेते गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक पवारांच्या पक्षात

कुडाळच्या उमेदवारीसाठी भाजप खासदार नारायण राणेंचा मुलगा निलेश राणेंच्या हाती धनुष्यबाण

संगमनेरमधून लढण्यासाठी राधाकृष्ण विखेंचा मुलगा सुजय विखे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता

नांदगावमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ तुतारी फुंकण्याची शक्यता

एकीकडे घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या यादीतही घराणेशाहीला रेड कार्पेट टाकण्यात आलंय..शिंदे गटाने 6 घराणेशाहीशी संबंधित उमेदवार दिले आहेत. नेमके कोणते नेते आहेत? पाहूयात

चिमणराव पाटलांचा मुलगा अमोल पाटलांना उमेदवारी

माजी खासदार आनंदराव अडसुळांचा मुलगा अभिजित अडसुळ यांना उमेदवारी

खासदार संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंना तिकीट

खासदार रवींद्र वायकरांच्या पत्नी मनिषा वायकरांना उमेदवारी

राजापूरमधून मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतांना तिकीट

दिवंगत अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना उमेदवारी

घराणेशाहीवर टीका करणाऱ्या एनडीएतील पक्षांनीच उमेदवारांच्या यादीत घराणेशाहीचा स्पष्टपणे पुरस्कार केलाय.. त्यामुळे हा मुद्दा भाजप आणि शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT