Maharashtra Assembly Elections

Sameer Wankhede: समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात? वानखेडेंची राजकारणात एन्ट्री?

Assembly Election : ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं चर्चा सुरू झाल्या आहेत.

Tanmay Tillu

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. हे नाव जरी कानावर पडलं तरी आठवतं हायप्रोफाईल आर्यन खान ड्रग्स प्रकरण आणि त्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. आता हेच समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगलीय. IRS अधिकारी समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी तयारीदेखील सुरु झालीये.. यात समीर वानखेडे यांचंही नाव समोर येतंय.

समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात?

समीर वानखेडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोनवेळा भेट

वानखेडे यांच्यासाठी दोन मतदारसंघाची चाचपणी

धारावी आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघाबाबत सखोल चर्चा

वानखेडे धारावीतून लढण्यास इच्छुक

आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे हे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी चर्चेत आले होते आणि वादातही सापडले होते. कोण आहेत समीर वानखेडे ते पाहूयात.

कोण आहेत समीर वानखेडे?

भारतीय महसूल सेवेतील IRS अधिकारी

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान

ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत

आर्यन खानला 1 महिन्यांहून अधिक काळ

तुरुंगात रहावं लागल्यानं चर्चा

समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे

लाच मागितल्याचा आरोप

लाच प्रकरणात समीर वानखेडेंवर गुन्हाही दाखल

कॉर्डिलिया क्रूझ पार्टीप्रकरणी

समीर वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी

राजकारणात येण्यापूर्वी समीर वानखेडेंना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा वानखेडेंचा मार्ग मोकळा होईल.मात्र ड्रग्ज तस्करांसाठी कर्दनकाळ ठरलेले समीर वानखेडे राजकारणात प्रतिस्पर्ध्यांचा कसा बिमोड करणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

SCROLL FOR NEXT