Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Pune Election: राज्यात आचारसंहिता लागू आहे, याच दरम्यान पुण्यातील हडपसर रोडवरील नाकाबंदीच्या काळात एका कारमध्ये २२ लाख रुपयांची रोकड सापडलीय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता काळात कुठलेही गैरव्यवाहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. या नाकाबंदी दरम्यान पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.

संबंधित गाडी ही सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना घडल्याच समोर आले आहे. हडपसर सोलापूर रोडवरून जाणाऱ्या एका गाडीत २२ लाख रुपये सापडले आहेत.

आचारसंहितेसाठी नाकेबंदी करणाऱ्या हडपसर पोलिसांना कार चेकिंगच्या वेळी एका कारमध्ये मोठी रक्कम सापडलीय. ही रक्कम किराणामाल दुकानदाराची आहे. एका होलसेल व्यापाऱ्याचे बिल असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येतेय. पोलिसांकडून या गाडीची चेकिंग सुरू असताना त्यामध्ये ही रक्कम आढळून आली.

खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता २२ लाखांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडालीय. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. खेड शिवापूर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलीय. मात्र रोकड जप्ती प्रकरणी गुन्हा दाखल होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलीय.

१० लाखांच्यावर रोकड असल्याने हे प्रकरण आता आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. तसेच आयकर विभागाकडे पाच कोटींची रोकड देखील वर्ग करण्यात आलीय. या प्रकरणात आता पुढील कारवाई आयकर विभाग त्यांच्या कायद्याप्रमाणे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान ⁠अशा प्रकरणात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्टॅंडर्ड ॲापरेटींग प्रोसीजर / एसओपी प्रणाणे कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Crime News: सून छोटे कपडे घालून रिल्स बनवायची; सासू सासरे कंटाळले, निराशेतून धक्कादायक पाऊल उचलले

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT