Ajit Pawar 
Maharashtra Assembly Elections

NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच

Ajit Pawar's NCP Candidate List : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली.

Rupali Badhave

Ajit Pawar NCP Third Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभ उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली. सुनील तटकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघाचा समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ४९ उमदेवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या यादीमध्येही नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा कऱण्यात आलेली नाही. नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

आज जाहीर झालेले उमेदवार -

फलटण - सचिन पाटील

निफाड - दिलीप बनकर

पारनेर - काशिनाथ दाते

गेवराई - विजयसिंह पंडीत

दिलीप बनकर यांना पुन्हा संधी ?

नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास दाखवलाय. भाजपाचे यतीन कदम यांनी देखील या जागेवर दावा करत अजित पवारांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरु होत्या, आज यावर शिक्कामोर्तब झालेय.

पारनेरमध्ये लंके विरुद्ध दाते लढत -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारनेर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी कडून राणी लंके जाहीर झाली असून आता पारनेर मतदारसंघात काशिनाथ विरुद्ध राणी रंगी असा सामना रंगणार आहे मात्र महायुतीमध्ये अजूनही काही नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते, ते काय भूमिका घेतात? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांना मारण्यासाठी 'ही' अगरबत्ती घेताय? त्याआधी ही माहिती वाचाच

ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

SCROLL FOR NEXT