Sanjay Raut On Vanchit Bahujan Aghadi Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: 'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचा ‌फॉर्म्युला तयार? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

Sanjay Raut News : एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुनील कांबळे

Sanjay Raut On Vanchit Bahujan Aghadi:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत म्हणाले आहेत की, ''शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्या उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मविआत असल्यामुळे उद्या यादी जाहीर करू.''

ते म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवार निश्चित केलेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचीही तयारी झालीय. एकाही जागेवरून संघर्ष, तणाव नाही.'', असंही ते म्हणाले आहेत.

'वंचित आमच्यासोबत असायला हवी'

वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''बहुजन वंचित आघाडी हा मविआतील महत्वाचा घटक पक्ष आहे. आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधतोय. संवाद कायम ठेवलेला आहे. मागेपुढे थोडे होते. ४ जागांचा प्रस्ताव दिला. त्यात अकोलाही आहे. तो त्यांना मान्य नाही. आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. वंचित आमच्यासोबत असायला हवी. आंबेडकरांशी निरंतर बोलणे सुरू आहे. त्यांच्याशी बोलले की प्रेरणा ऊर्जा मिळते.''

बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, ''बारामतीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. मीही सभा घेतलीय, वेळ पडली तर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील. सुप्रिया सुळे या जिंकून येणार असल्यानं तिथे कुणी लढायला तयार नाही.''

दरम्यान, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आता जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे. मविआने वंचितला पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. याचबाबत आज सांयकाळी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यामध्ये जो निर्णय घेतला जाईल, तो उद्या प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, अशी माहिती वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT