Chandrahar Patil and Vishal Patil came face to face; What Happend After That Watch Video Saam Digital
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha Election: चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आले आमने-सामने; दोघांनी एकमेकांशी काय संवाद साधला? पहा Video

Chandrahar Patil Vs Vishal Patil: शहरातील बापट मळा या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची आज भेट झाली. यावेळी नागरिकांनी देखील दाेघांशी संवाद साधला.

विजय पाटील

सांगली

सांगली लाेकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (chandrahar patil) आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील (vishal patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज (शुक्रवार) दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचार निमित्त एकाच ठिकाणी आले. त्याची चर्चा शहरात अवघ्या काही क्षणात रंगली.

या दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस देखील केली. शहरातील बापट मळा या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची ही भेट झाली. त्यानंतर दाेघे नियाेजित कार्यक्रमांसाठी निघून गेले.

चंद्रहार पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

दरम्यान विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (chandrahar patil) व समर्थकांविरुद्ध आचारसंहिता भंगचा (code of conduct) गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनूसार चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात प्रचार फेरी काढली होती. ही फेरी 24 एप्रिलला सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 पर्यंत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटींसाठी हाेती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची पदयात्रा हाेती. त्यास परवानगी घेण्यात आली नव्हती. दरम्यान चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या 2 ते 3 समर्थकांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT