udayanraje bhosale statement on satara lok sabha election 2024
udayanraje bhosale statement on satara lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Udayanraje Bhosale : सातारा लाेकसभा मतदारसंघ: 'सेवानिवृत्ती जाहीर करा, एकेकाकडे बघताेच'; उदयनराजे भोसलेंच्या वक्तव्यावर हशा आणि टाळ्या (VIDEO)

ओंकार कदम

Satara Lok Sabha Constituency :

मला सेवानिवृत्त हा शब्द आवडतच नाही, नाहीतर येथे कोण तरी खोडसर बोलले असणार ते सेवानिवृत्त होत आहेत. तुम्ही तुमची सेवानिवृत्ती जाहीर करा, येथे आम्ही सेवानिवृत्त नाही मी येथे कार्यक्रमाला आलो आहे एवढेच लक्षात ठेवा असे म्हणत राजकारणातून सेवानिवृत्ती न होण्यावर ठाम असल्याचे उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ते परळी खाे-यातील एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमा प्रसंगी बाेलत हाेते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) खासदार उदयनराजे भाेसले यांना लाेकसभा निवडणुक लढविण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी जय्यत तयार केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भाेसले यांनी साता-याच्या हद्दीपासन सातारा शहरापर्यंत शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मी निवडणुक लढविणारच. कमळ चिन्हावरच निवडणुक लढवणार असेही स्पष्ट केले.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून अद्याप सातारा लाेकसभा मतदारसंघात उमेदवाराची घाेषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवार काेण याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

परळी खाे-यातील एका शिक्षकाच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या सोहळ्यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी उपस्थिती लावली हाेती. यावेळी खासादर उदयनराजे भोसले यांनी जाहीर सत्कार समारंभात व्यासपीठावरुन बाेलताना आपल्याला सेवानिवृत्त शब्द आवडत नसल्याचे म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी मित्राच्या कार्यक्रमला आलाे आहे नाहीतर कोण तरी खोडसर बोललं असणार ते सेवानिवृत्त होत आहेत, तुम्ही तुमची सेवानिवृत्ती जाहीर करा असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT