mla sunil shelke opposed mp shrirang barne candidate for maval lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Sunil Shelke News: मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार; सुनील शेळकेंकडून 'यू टर्न' घेण्याची तयारी

Maharashtra Loksaha Election 2024: मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र आता सुनील शेळके यांनी युटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे.

दिलीप कांबळे

Maval Loksabha Constituency News:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमध्ये उमेदवारीवरुन धुसफूस, नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र आता सुनील शेळके यांनी युटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे. (Maharashtra Loksaha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की, मावळ लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असून याठिकाणी श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी विरोध दर्शवला होता. तसेच मावळ लोकसभेवर दावाही ठोकला होता. मात्र आता सुनील शेळके यांचा विरोध मावळल्याचे दिसत आहे.

सुरुवातीपासून मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आता यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, असा आदेश देत बारणे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता "अजित दादा जे आदेश देतील, त्याचं पालन आम्ही करू. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ, असे म्हणत सुनील शेळके यांनी यूटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे आमचा मावळ लोकसभेवर दावा आहे," असेही सुनील शेळके म्हणालेत. (Maharashtra politics News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

SCROLL FOR NEXT