Raj Thackeray on Uddhav Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: ...म्हणून उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतात, राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

Raj Thackeray on Uddhav Thackeray: ''आज उद्धव ठाकरे, संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. यांचे कारण म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही'', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

Satish Kengar

Raj Thackeray on Uddhav Thackeray:

''आज उद्धव ठाकरे, संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. यांचे कारण म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही'', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. आज शिवतीर्थावर (Shivaji Park) मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यामध्येच कार्यकर्त्यांना संबोधित करतं ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''मी जो विरोध केला, तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे, संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात यायचं होतं.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींकडे केली अपेक्षा व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की, ''माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे की, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या, तसं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.'' ते म्हणाले, ''जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला, तर मात्र या देशात अराजकता येईल.''  (Latest Marathi News)

यावेळी त्यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.''

पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की,''माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT