Lok Sabha Election 2024 News Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: लढणाऱ्या लेकींसाठी 'बाप' बुलंद कहाणी, शिंदे-पवारांनी सोलापूर-बारामतीची सूत्रे घेतली हाती

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ही दोन नावे घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ही दोन नावे घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत कर्तृत्व गाजवलेले दोन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघे लेकींसाठी मतदारसंघात उसवलेली घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादीतील दुफळीमुळे, कौटुंबिक संघर्षात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यापेक्षा अधिक सक्रिय व्हावे लागत आहे. राजकीय मतभेद विसरुन त्यांनी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी बारामतीत 50 वर्षानंतर राजकीय वैर असलेल्या काकडे कुटुंबियांनी भेट घेतली. त्यानंतर पवारांनी चंद्रराव तावरेंचीही भेट घेतली.इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर या मतदारसंघांत पवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

शरद पवार हे 1967 पासून निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी बारामतीमधून 1967 मध्ये प्रथम विधानसभेची निवडणूक लढवली होती. पवार हे स्वतः उमेदवार असायचे, त्यावेळीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर फिरायचे. शेवटची सांगता सभा तेवढी बारामतीत पवार घ्यायचे, हे चित्र बारामतीत वर्षानुवर्षे दिसून आलं आहे. यंदा मात्र निकराची लढाई असल्यानं पवारांना भ्रमंती करावी लागतेय. सुप्रियांच्या आपल्या वडीलांबाबतच्या भावना खूप काही बोलून जातात.

दुसरीकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कन्या प्रणितीसाठी सोलापूरमध्ये बसून सूत्रं हलवत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचा मागील दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच, शिंदे मुख्यमंत्री असताना पत्नी उज्ज्वला शिंदे यांचाही 2009 मध्ये पराभव झाला आहे. आई, वडील यांच्या पराभवाचे दुःख धुऊन काढण्यासाठी कन्या प्रणिती शिंदे यांनी यंदा चंग बांधला आहे.

बापाचा जीव लेकीत असतो. याची प्रचिती वयाच्या ८० व्या वर्षी धडपडणाऱ्या, राजकीय मैदानात मुलींसाठी शड्डू ठोकून उभ्या असलेल्या या बापाकडे पाहून येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT