Praniti Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Praniti Shinde News: सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली! मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेसला पाठिंबा

Maharashtra Politics: प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेल्या नरसय्या अडम यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Loksabha Constituency News:

महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभेच्या उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची ताकद चांगलीच वाढली आहे. प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नरसय्या अडम यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. मात्र वंचित आघाडी तसेच एमआयएमनेही सोलापूरमधून उमेदवार जाहीर केल्याने प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत होती.

अशातच सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपा विरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय, असे आडाम मास्तर यांनी स्पष्ट केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पाठिंबा देतानाच प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्यच्या जागेवर नरसय्या अडम यांनी दावा केला आहे. शहर मध्यच्या जागेबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटेल यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये शरद पवारांनी शहर मध्यची जागा माकपला द्यावी, त्याबाबत सिताराम येचुरी यांनी चर्चा करावी असे सुचवले होते. त्यानुसार सिताराम येचुरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला संमती दर्शवली असल्याचे आडाम मास्तर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT