shoumika mahadik may contest from hatkanangale lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लाेकसभा मतदारसंघाची शौमिका महाडिकांवर भिस्त?

Hatkanangale Lok Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप घराघरात पोहोचण्यासाठी एक जागा लोकसभा लढवण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Hatkanangale Lok Sabha Constituency :

पक्षाने आदेश दिला तर शौमीका महाडिक हातकणंगले लाेकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात दिसतील असे ठाम मत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. दरम्यान महायुतीमध्ये हातकणंगले लाेकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. महाडिक यांच्या निवडणुक लढण्याच्या पावित्र्याने हा मतदारसंघ काेणाच्या पारड्यात पडताे हे आज (गुरुवार) निश्चित हाेणार असल्याचे समजते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सद्यस्थितीत कोल्हापूर (kolhapur lok sabha constituency) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी उमेदवारी दिल्याचे संकेत खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) हे माध्यमांना सांगत आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन पैकी एक मतदार संघ भाजपकडे घ्यावा अशी मागणी केली हाेती.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप घराघरात पोहोचण्यासाठी एक जागा लोकसभा लढवण्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. त्यातच शौमिका महाडिक यांना जर पक्षाने आदेश दिला तर शौमीका महाडिक हातकणंगलेच्या निवडणूक रिंगणात असतील असे धऩंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT