sharad pawar held meeting in satara lok sabha constituency
sharad pawar held meeting in satara lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Satara Politics : अजित पवार गटातील नेता शरद पवारांच्या भेटीला; निवडणुकीआधी साताऱ्यातील राजकीय समीकरणं बदलणार?

ओंकार कदम

Sharad Pawar In Satara :

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) हे आज (शुक्रवार) सातारा दाै-यावर आले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) गटाचे नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे (prabhakar gharge) यांची चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पवार यांची पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी महत्त्वाची चर्चा सुरु आहे. भविष्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती काय असेल याच्यावर देखील चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांच्यापेक्षा आमदार बाळासाहेब पाटील (mla balasaheb patil) यांना उमेदवारी मिळावी यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी खूद्द खासदार शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह आजही धरला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT