Prakash Ambedkar Saam TV
लोकसभा २०२४

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Maharashtra Lok Sabha: शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Prakash Ambedkar On Sharad Pawar:

>> हिरा ढाकणे

शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत केलं आहे. ते वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दोन्ही नेत्यांच्या चौकशा चालू आहेत आणि त्यामुळे यांना पर्याय नाही. उद्या NRC, CAA, हिजाब किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल त्यावर राष्ट्रवादीचा निवडून दिलेला खासदार त्या सभागृहात बोलणार का? तर अजिबात नाही.

काल मुंबईमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा होत्या. त्यावर देखील आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, एकदंरीत आपण पाहिले की, काल मुंबईत दोन तमाशे झाले एक शिवाजी पार्क येथे झाला आणि दुसरा बीकेसी मैदानावर झाला. एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नव्हते. पुढील पाच वर्षांत काय करणार? याबाबतचा त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नव्हता.

पंतप्रधनाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे, ते मानवतेचे कार्यालय न राहता आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे आणि या वसुलीमुळे २०१४ पासून १७ लाख कुटुंब, ज्यांची मालमत्ता ५० कोटींच्या वरती आहे, त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले आणि परदेशात स्थायिक झालेत. ही सरकारी आकडेवारी आहे. तुम्हाला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की, वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला ठरवण्याची वेळ आली असल्याचे ते या सभेत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Red Chilli Chutney Recipe: झणझणीत लाल मिरची चटणी कशी बनवायची?

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवशी खात्यात ₹२००० येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT