Abhijeet Bichukale
Abhijeet Bichukale saam tv
लोकसभा २०२४

Abhijeet Bichukale: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार, १९ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

Priya More

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस मराठी'मुळे (Bigg Boss Marathi) प्रसिद्धी मिळालेले साताऱ्याचे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) सध्या चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रिंगणामध्ये उतरणार आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 'उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला ऐवढा वेळ का लागला? याचे आत्मपरीक्षण करावे असे म्हणत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा करणार आहे.', असे अभिजीत बिचकुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'मतदारराजा जागृत आहे. येत्या १९ एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. उदयनदादांची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी देखील करावे.', असा सल्ला अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे.

त्याचसोबत, 'विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या.' अशी मागणी त्यांनी केली. तसंच, 'समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार. वैचारिक वारस म्हणून धाडस केले पाहिजे.', असे मत अभिजीत बिचुकले यांनी केले आहेत. तसंच, '२ रुपयांची दारू पाजून मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही. शरद पवार आणि उदयनराजे हार्ड वैर आहे. उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील आणि शरद पवार प्रयत्न करत आहेत.', असे विधान अभिजीत बिचुकले यांनी केले आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. अशामध्ये आता अभिजीत बिचुकले यांनी या मतदार संघामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT