Sangli Loksabha Constituency News:  saam tv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha News: पठ्ठ्याने करुन दाखवलं ! सांगलीच्या खासदारकीचा 'चंद्रहार' विशाल पाटलांच्या गळ्यात

Sangli Loksabha Election Result: ठाकरेंची कुरघोडी, महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरुन झालेला कलह अन् विशाल पाटील यांच्या बंडखोरीने सांगली लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली. अखेर या अटीतटीच्या लढतीचा निकाल समोर आला असून सांगलीचा खासदार फिक्स झाला आहे.

Gangappa Pujari

विजय पाटील, सांगली, ता. ४ जून २०२४

देशासह राज्याकील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदार संघातील तिरंगी लढतीचा अंतिम निकाल समोर आला आहे. सांगलीच्या हायहोल्टेज लढतीत यांनी विशाल पाटील यांनी बाजी मारली असून 1लाख 1 हजार 94 मतांनी मतांनी विजय मिळवत सांगलीची खासदारकी मिळवली आहे.

सांगलीचा खासदार ठरला!

महाविकास आघाडीमध्ये झालेल्या उमेदवारीच्या कुरघोडीवरुन गाजलेल्या सांगली लोकसभेचा अंतिम निकाल आता समोर आला आहे. महायुतीकडून संजय काका पाटील, महाविकास आघाडी पुरस्कृत ठाकरे गटाचे उमेदवार महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यामध्ये झालेल्या या तिरंगी लढतीत विशाल पाटील यांनी बाजी मारुन सर्वांनाच धक्का दिला आहे.

तिरंगी अन् चुरशीची लढत!

तत्पुर्वी सांगली लोकसभेत उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाने कोणतीही चर्चा न करता थेट डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. ठाकरेंच्या या कुरघोडीने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अखेर बंडाचा झेंडा फडकावत पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीला न जुमानता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

या बंडखोरीमुळे सांगलीत संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. त्यामुळेच अत्यंत चुरशीची आणि अटीतटीच्या या लढतीत सांगली लोकसभेचा चंद्रहार कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या लढतीत विशाल पाटील यांनी बाजी मारत सर्वांनाच धक्का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT