Nitesh Rane Celebration Video Saam TV
लोकसभा २०२४

Narayan Rane : नारायण राणेंना मोठी आघाडी मिळताच नितेश राणेंचा जल्लोष; आईला मिठी मारली अन् उचलून घेतलं, पाहा VIDEO

Nitesh Rane Celebration Video : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी आघाडी घेताच नितेश राणेंनी जल्लोष केला. पाहा व्हिडीओ...

Satish Daud

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू असून निवडणुकांचे कल समोर येत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना पिछाडीवर सोडलं आहे. दरम्यान, वडिलांच्या आघाडीनंतर आमदार नितेश राणे यांनी जल्लोष केला. त्यांनी आईला मिठी मारून उचलून घेतलं. या जल्लोषाचा व्हिडीओ समोर आला आहे.

चौदाव्या फेरी अखेर नारायण राणे यांना २ लाख ६७ हजार ६९० इतकी मते मिळाली आहे. तर विनायक राऊत यांना २ लाख ४० हजार ४३१ इतकी मते पडली आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी तब्बल २७ हजार २५९ मतांची आघाडी घेतली आहे. वडिलांनी आघाडी घेताच आमदार नितेश राणे यांनी मोठा जल्लोष केला आहे.

मतमोजणी केंद्राबाहेरच आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. यावेळी त्यांच्या आई देखील सोबत होत्या. नारायण राणे यांच्या आघाडीनंतर नितेश राणे यांनी आईला मिठी मारली. इतकंच नाही, तर त्यांनी आईला मिठी मारत उचलून घेतलं. त्यांच्या या जल्लोषाचा व्हिडीओ समोर आला आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात अटीतटीची लढत होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून नारायण राणे यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची आघाडी वाढून १,२०२ इतकी झाली.

मात्र, पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडलेल्या राऊतांनी तिसऱ्या फेरीत चांगली लिड घेत नारायण राणे यांच्यावर ३० मतांची आघाडी घेतली. पण त्यानंतर चौथ्या फेरीपासून राणेंच्या मताधिक्यांमध्ये वाढच होत गेली. आता १४ व्या फेरीअखेर नारायण राणे यांच्याकडे जवळपास २८ हजार मतांची आघाडी आहे. अजूनही मतमोजणीच्या ११ फेऱ्या होणार आहे. या फेरीत मतदार नेमका कुणाला कौल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT