Ramdas Athawale  Saam tv
लोकसभा २०२४

Ramdas Athawale : मोदींना हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही; रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा

Ramdas Athawale latest News : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. मोदींना हरवणे वेडे गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आठवलेंनी विरोधकांवर टीका केली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत. या निवडणुकीत भाजपने ४०० पार जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर भाजप फक्त देशात ४५ जागा जिंकेल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. मोदींना हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आठवलेंनी विरोधकांवर टीका केली.

महायुतीने बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज अर्ज भरणार आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ आज जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. या सभेआधी रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली.

रामदास आठवले म्हणाले, '४५ पेक्षा जास्त जागा मिळणार. महायुतीच्या पाठीशी सगळे उभे राहिले आहेत. बारामतीतून सुनेत्रा पवार उभ्या आहेत.अजित पवार याची ताकद मोठी आहे. देश विकास करत आहे. मोदींना पाडण्यासाठी काँग्रेससह इतर जण एकत्रित आले आहेत. नरेंद्र मोदींना हरवणे येड्या गबळ्याचे काम नाही. सुप्रिया सुळे चांगल्या भाषण करतात. पण विकासाच्या पाठीशी अजित पवारांच्या सर्वांनी उभे राहिले पाहिजे. बारामती लढाई जिंकणे आमच्यासाठी महत्वाचे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT