Raj Thackeray On Narayan Rane Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

Raj Thackeray On Narayan Rane: ''नारायण राणे यांना ६ महिने वेळ मिळाला होता मुख्यमंत्री म्हणून. पाच वर्ष मिळाली असती, तर आज कोणाला इकडे प्रचार करायला यावं लागलं नसतं'', असं म्हणत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray On Narayan Rane:

''नारायण राणे यांना ६ महिने वेळ मिळाला होता मुख्यमंत्री म्हणून. पाच वर्ष मिळाली असती, तर आज कोणाला इकडे प्रचार करायला यावं लागलं नसतं'', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे. आज कणकवली येथे आयोजित सभेत त्यांनी राणे यांचं कौतुक केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ''जेव्हा ते (नारायण राणे) मुख्यमंत्री झाले, तेव्ह मला प्रश्न पडला होता की, ते सर्व सांभाळू शकतील का? पण त्यांनी जे केलं. ते भल्याभल्यांना जमले नाही.'' एका किस्स्याची आठवण करून देत ते म्हणाले, ''राणे तुम्ही विसरून गेला असाल. त्यावेळी अनिल शिदोरे, अभत बंग यांना नारायण राणेंकडे घेऊन गेले होते. कुपोषणाचा मुद्दा होता.''

ते म्हणाले, ''नारायण राणे यांनी ऐकायला सुरुवात केली. कुपोषित बालमृत्यूचा मुद्दा ते सांगत होते. त्यांनंतर नारायण राणेंनी सभागृहात हा मुद्दा प्रखरपणे मांडला. एखादा विषय समजून घेणे, ते कसं मांडणं, हे ज्याला माहित आहे आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीला उभा आहे.''

उपस्थित लोकांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, ''एक प्रश्न आहे, नुसतं दिल्लीत जाऊन बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की, मंत्री बनून कोकणवासीयांचा विकास करणारा खासदार पाहिजे? मोदींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री असणार. मी माझे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जणार आणि माझ्याकडून ते होणार नाही, असं ते बोलणार नाही, ते नक्की मार्ग काढणार. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :फक्त लीड मोजा, महायुती १६० जागांवर येईल - चंद्रकांत पाटील

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT