मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत ज्येष्ठ भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यातच एक चर्चा अशी होती की, राज ठाकरे हे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात. याच चर्चेला पूर्णविराम देत राज ठाकरे म्हणाले आहेत की, ''मला जर शिवसेना प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो.'' शिवतीर्थावर (Shivaji Park) आयोजित मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेबांशिवाय कोणाच्या ही हाताखाली काम करणार नाही.'' मी मनसेचा अध्यक्षच राहणार, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत की, त्यावेळी त्यांच्या घरी जवळपास 32 आमदार आणि सहा ते सात खासदार आले होते. आपण एकत्र बाहेर पडू असं ते म्हणाले होते. मात्र यानंतर त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आणि त्यावेळी इथे बांधणी सुरू होती. ते म्हणाले आहेत की, त्यावेळी त्या आमदार आणि खासदारांना त्यांनी सांगितलं की, पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करायची नाही. (Latest Marathi News)
राज ठाकरे म्हणाले आहेत की, ''मी अमित शहांना भेटल्यानंत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, २०१९ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.''
ते म्हणाले, ''एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे, हे पाहत नाही. रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.