Rahul Gandhi Vs Narendra Modi  Saam Digital
लोकसभा २०२४

Rahul Gandhi Vs Narendra Modi : राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसोबत एकत्र चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं; मोदींनाही सहभागी होण्याचं केलं आवाहन

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी एकत्र चर्चेच निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारलं आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून संपूर्ण देशात प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि भाजप यांच्यात लढत होत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी एकत्र चर्चेच निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहनही केलं आहे.

निमंत्रण स्वीकारल्याच पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकुर यांना पाठवलं आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी एकाच व्यासपीठावरुन देशासमोर आपले व्हिजन मांडणे हा सकारात्मक उपक्रम आहे. काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारतं आहे. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे अशी देशाची अपेक्षा असल्यांच नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मात्र नरेंद्र मोदी या चर्चेचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. २ दिवसांपूर्वी माजी न्यायमूर्ती मदन लोकुर, माजी न्यायाधीश अजित शाह यांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना एकाच मंचावर चर्चेसाठी निमंत्रण पाठवलं होत.

निवृत्त न्यायमूर्तींनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि संपूर्ण जग भारतातील निवडणुका मोठ्या उत्सुकतेने पाहात आहे. त्यामुळे, अशा सार्वजनिक चर्चांमुळे मोठा आदर्श जनतेसमोर आणि जगासमोर ठेवला जाणार नाही. अशा चर्चांमधून लोकशाहीची खरी प्रतिमा लोकांसमोर येईल. आपले नेते रॅली आणि जाहीर सभांमध्ये एकमेकांना विचारणाऱ्या प्रश्नांवर समोरासमोर बोलले तर अधिक चांगलं होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे आमंत्रण स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT