PM Narendra Modi  Saam Digital
लोकसभा २०२४

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : देशाला मजबूत सरकारची गरज असून ही निवडणूक देशाला तिसऱ्या स्थानावर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या देशाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याचंही ते म्हणाले.

Sandeep Gawade

देशाला मजबूत सरकारची गरज असून ही निवडणूक देशाला तिसऱ्या स्थानावर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या देशाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसच्या चार पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं मात्र आज त्यांच्यात ४ जागाही लढण्याची ताकद नाही. जिथे १० जनपथ आहे तिथेही काँग्रेसला लढता येत नाही, अशी अवस्था सध्या काँग्रेसची असल्याची टीका त्यांनी केली.

2024 ची ही निवडणूक भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी होत आहे. काही शक्ती देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत काढण्याचं काम करतायेत, अशा शक्तींपासून देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे. गरीब आणि मध्यम वर्गीयांचं जीवनमान उंचवायचं आहे. गरीब आणि मध्यवर्गीयांची संपत्ती हिरावून घेणाऱ्यां शक्तींपासून दूर ठेवलं पाहिजे. भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करायच्या आहेत.

2024 च्या निवडणुका या परंपरा आणि विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आहेत. ज्यांनी काका-पुतणे, भाऊ-भाऊ वाद आणि घराणेशाहीमुळे वर्षानुवर्षे भारतातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. येथील विकास कामाकार्यात इंडिया आघाडी अडथळा ठरत आहे. ते दिल्लीतील जनतेला लुटण्याची एकही संधी सोडत नाहीत. हे लोक भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली आले, पण आज करोडो रुपये कमवत आहेत. पैशांच्या घोटाळ्यामुळे ते तुरुंगात असल्याची टीका त्यांनी केली.

मी ना माझ्यासाठी जगतो ना हा जन्म झाझ्यासाठी घेतला आहे. मी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेत आहे. 50-60 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे घर सोडलं तेव्हा मला हे देखील माहित नव्हतं की एक दिवस मी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवीन. तेव्हा मला माहिती नव्हतं की 140 कोटी भारतीय माझं कुटुंब बनतील, असे उद्गार त्यांनी काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live Update: नागपुरात बडकस चौक मित्र परिवार तर्फे दहीहंडी स्पर्धेच आयोजन

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT