PM Modi and Raj Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

PM Modi News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

>> विनोद पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे.

मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. दरम्यान, मोदींच्या सभेला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय.

राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घेण्यावरून अनिल परबांनी निशाणा साधलाय. मला माझ्या कडेवर दुसऱ्याची पोरं खेळवायची नाहीत, असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता कुणाची पोरं खेळवणार आहेत असा सवाल अनिल परबांनी केलाय.

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होतेय.

मुंबई कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. उद्धव ठाकरेंविरोधात पंतप्रधान मोदी स्वत; मुंबईच्या मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरेंविरोधात राज ठाकरेही मोदींना बळ देणार आहेत. म्हणूनच मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मोदी- ठाकरेंची ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : घरच्या घरी करा पार्लरसारखे हेअर सेट, लगेचच फॉलो करा 'या' टिप्स

Maharashtra Live News Update: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पुणे पोलिसांकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Parliament Session:भारतात चीनची घुसखोरी राहुल गांधींच्या आरोपानंतर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; कोणत्या पुस्तकावरून लोकसभेत गोंधळ उडाला?

राजकारणात मोठा उलटफेर; ठाकरे महापौर होणार, भाजपकडून घोषणा

Nikki Tamboli: बाई काय हा प्रकार...; निक्की तांबोळी अरबाज पटेलसमोर ढसाढसा रडली, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT