Narendra Modi Vs Rahul Gandhi Saam Digital
लोकसभा २०२४

Narendra Modi Vs Rahul Gandhi : नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना माजी न्यायमूर्तींनी दिलं एकत्र चर्चेचं निमंत्रण; चर्चेला येणार का? संपूर्ण देशांचं लक्ष

Narendra Modi Vs Rahul Gandhi : सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून संपूर्ण देशात प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि भाजप यांच्यात लढत होत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीर चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी हे निमंत्रण दिलं आहे.

निवडणुकीचा काळ सुरू असल्याने सध्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. दोघांकडे वेळ नसेल तर ते आपले प्रतिनिधी चर्चेला पाठवू शकतात असंही म्हटलं असून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या चर्चेला येणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

“आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत आणि संपूर्ण जग आमच्या निवडणुका मोठ्या उत्सुकतेने पाहात आहे. त्यामुळे, अशा सार्वजनिक चर्चांमुळे मोठा आदर्श ठेवला जाणार नाही. अशा चर्चांमधून लोकशाहीची खरी प्रतिमा सादर होईल.आमचे नेते रॅली आणि जाहीर सभांमध्ये एकमेकांना विचारणाऱ्या प्रश्नांवर समोरासमोर बोलले तर खूप चांगलं होईल, असं पत्रात म्हटलं आहे.

दोन्ही नेत्यांनी एका व्यासपीठावर एकत्र यावं आणि निवडणुकीदरम्यान प्रचलित असलेल्या मुद्द्यांवर विचार जनतेसमोर मांडावेत. हा कार्यक्रम कुठे होणार, तो किती दिवस चालणार आणि त्याचे सूत्रसंचालन कोण करणार हे परस्पर संमतीने ठरवावे. हे दोन्ही नेते येऊ शकत नसतील तर ते त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात, असं पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT