CM Eknath Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला, या आमदाराला मिळणार तिकीट?

Shinde group News: एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

South Mumbai Lok Sabha:

>> आवेश तांदळे

एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला पसंती दिली. यामिनी यशवंत जाधव सध्या मुंबईतील भायखळा विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत.

कोण आहेत यामिनी यशवंत जाधव?

यामिनी यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिका नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडलीय. मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या अध्यक्ष होत्या. विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या सदस्या होत्या. या समितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT