Amol Mitkari Saam TV
लोकसभा २०२४

Amol Mitkari News: महायुतीत नाराजी नाट्य! भाजपने हवेत राहू नये; अमोल मिटकरींचा खोचक टोला

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. २१ मार्च २०२४

Amol Mitkari News:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीतील शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट तसेच भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपच्या उमेदवाराने प्रचारासाठी विचारात घेतले नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी नाराजी व्यक्त केली आहे.

अकोल्यात स्थानिक भाजप पक्ष लोकसभेच्या प्रचारात आपल्याला दूर ठेवत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्यापपर्यंत अकोल्यातील भाजप आमदार किंवा भाजपचे उमेदवार असलेले अनूप धोत्रे यांचा आमदार म्हणून फोनही सुद्धा नाही, त्यामुळे आपण आमंत्रण आल्याशिवाय प्रचार करणार नसल्याचे मिटकरींनी स्पष्ट केले आहे.

तसेच यासंदर्भात आपल्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा कळवण्यात आले आहे. "सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलोय असं भाजप समजत असेल तर हा सर्व भ्रमाचा भोपळा आहे. आज लोकशाहीमध्ये जनता सर्वच्च आहे, जनतेचा विचार करून पुढे जावं, हवेत राहू नये, असा सल्ला स्थानिक भाजपाच्या आमदारांना देत सन्मान दिला तर सन्मानाने सोबत आहोत," असेही अमोल मिटकरी म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, "आपल्या मागे पाठबळ नाहीये, मोठा समाज नाहीये, त्यामुळे आमदाराचा कुठलाही फायदा होत नाही, असे समजू नका. आज जिल्ह्यात रक्तापेक्षा विचारांचे नाते खूप पेरलेले आहे. ज्या भागात मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून काम केले तिथून सर्वांचे फोन येऊन गेलेत, असे म्हणत आता जिल्हाभरात कॉर्नर सभा आणि बैठका उद्यापासून सुरू करणार असल्याचेही मिटकरींनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT