Pune Lok Sabha 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Pune Lok Sabha 2024: पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

BJP Violated Code Of Conduct: भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. संबंधित भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Maharashtra Politics Congress Complains To Election Commission

पुण्यात (Pune Lok Sabha 2024) भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. संबंधित भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपने पुण्यात विकसित भारत या पुस्तिकेचे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला (BJP Violated Code Of Conduct) आहे.  (Maharashtra Lok sabha Election)

भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भाजपकडून या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं (Pune Lok Sabha) होतं. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा दाखला देत काँग्रेसने पुणे मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेल्या 'विकसित भारत' पुस्तिकेचं कथित वितरण केल्याप्रकरणी भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 16 मार्च लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार (Maharashtra Politics) आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आलाय, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर आचारसंहिता सुरू होते. आचारसंहीतेमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली ( Congress Complains To Election Commission) जाते. आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांचा निवडणूक प्रचार, सभा तसेच मिरवणुकीबाबत नियमावली देण्यात आली आहे.

या नियमांचं (Code Of Conduct) उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यामध्ये उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकतं. मोठ्या नियमांचं उल्लंघन केल्यास फौजदारी खटला देखील दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये सदर व्यक्तीस तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT