BJP Party Update Saam Tv
लोकसभा २०२४

BJP Party Update: लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार; काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार

BJP Will Big Changes After Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमके हे बदल कोणते असणार? भाजप कोणते मोठे निर्णय घेणार? असे प्रश्न आता निर्माण होत आहे. आमदार आणि खासदारांसारखेच आता भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे देखील रिपोर्ट कार्ड बनविण्यात येणार आहे.

तर भाजपकडून (BJP Party Update) प्रत्येक विधानसभेसाठी विस्तारक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र ज्या पद्धतीने लोकसभेत काम व्हायला पाहिजे होते, त्या पद्धतीने काम झालं नसल्याचा अहवाल आता समोर आला आहे. त्यामुळे भाजपने संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेची कामगिरी बघून विस्तारकांसंदर्भातला मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सुमार कामगिरी असणाऱ्या विस्तारकांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.

दोन दिवस विस्तारक योजनेची भाईंदर येथे बैठक पार पडली. त्या ठिकाणी हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे लवकरच ज्यांनी काम केले नाही त्यांना भाजपकडून आता घरचा रस्ता (Lok Sabha Election Result) दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष , मंडळ प्रमुख, पन्ना प्रमुख यांचा देखील रिपोर्ट तयार करणार येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ लोकसभा विस्तारक आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ विधानसभा विस्तारक नेमले गेले होते. मूळ लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ सोडून भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी यांना विस्तारक म्हणून अन्य मतदारसंघांमध्ये पाठवण्यात आलं होतं. विस्तारकांकडे पन्नाप्रमुख, ३१ जणांची बूथसमिती, ११ जणांची कार्यविभाजन समिती नेमण्याची जबाबदारी होती. या विस्तारकांनी महिन्यातून केवळ ४ दिवस आपल्या घरी जायचं आणि बाकीचे दिवस नेमून दिलेल्या मतदारसंघात काम करायचं अशी पद्धत ठरवण्यात आली होती.

लोकसभा मतदारसंघासाठी (Maharashtra Politics) आणि सहा विधानसभा क्षेत्रासाठी विस्तारक लोकसभा निवडणुकीसाठी नेमले होते. लोकसभेत कसं मतदान झालं, कोणत्या विभागातून किती मतदान झालं याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु भाजपला (BJP) अपेक्षित कामगिरी झालं नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे. लोकसभेत काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजप आता घरचा रस्ता दाखवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT