Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : शिंदेंचं 'कल्याण', भाजपला चिंता?; भाजपच्या गडात शिंदेंचा वरचष्मा?

Lok Sabha Election 2024 : कल्याण-डोंबिवलीत गेल्यावेळपेक्षा चार टक्क्यांनी मतदान वाढलंय. त्यामुळे या मतदारसंघातली चूरस वाढलीय. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना झाला तर त्यांची हॅट्ट्रीक होणार.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवलीत गेल्यावेळपेक्षा चार टक्क्यांनी मतदान वाढलंय. त्यामुळे या मतदारसंघातली चूरस वाढलीय. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना झाला तर त्यांची हॅट्ट्रीक होणार. मात्र असं झालं तर भविष्यात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. त्यावरचा हा रिपोर्ट.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात 4 टक्क्यांची वाढ झालीये..कल्याण डोंबिवली भाजपचा गड राहिलाय. भाजपची ताकद या मतदारसंघात अधिक आहे. त्यामुळे शिंदेंची हॅट्रिक भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते.

काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमानी मतदार हा भाजपच्या दावणीला बांधलेला होता. त्यामुळे भाजप इथे रुजली आणि बहरलीही. मात्र गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे इथल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या. म्हणूनच उमेदवारीवरुन प्रचंड नाराजीनाट्य रंगलं. त्यामुळेच श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीच्या घोषणेला फार उशीर झाला. आता शिंदेंची हॅट्रिक झाल्यास त्यांच राजकीय वजन वाढणार आहे.

कुणाचं कल्याण ? कुणाचा गेम ?

श्रीकांत शिंदेंना 5 लाख मतांनी विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. हा निर्धार त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलाय. मात्र शिंदेंच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी कल्याण पूर्व, मुंब्रा आणि कळवा, उल्हासनगरातील काही भागांत जोरदार प्रचार केला. तिथून त्यांना अधिक मतदानाची अपेक्षा आहे. तिथे अधिक मतदान झाल्यास शिंदेंचं मताधिक्य घटू शकतं. त्यात कल्याण - डोंबिवली मतदारसंघांमधील हजारो मतदारांची नावं यादीतून गायब झाल्यानं याचा फटका शिंदेंना बसणार की दरेकरांना याची उत्सुकता आहे.

मोठ्या मताधिक्यानं विजय झाल्यास श्रीकांत शिंदेंचं राजकीय कल्य़ाण होईल. मात्र शिंदेंची ठाण्यासारखी कल्याण-डोंबिवलीत वाढणारी ताकद भाजपसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते. कारण आधीच कल्याणचे भाजप नेते आणि श्रीकांत शिंदेमध्ये सारंकाही आलबेल नाही. त्यामुळे कल्याणा डोंबिवलीतील आगामी राजकारण अधिक रंगतदार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT