Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : मन की बात केली, पण जनतेच्या मनातल्या भावनांच काय?; आदित्य ठाकरेंचा नरेंद्र मोदी,भाजपवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली.

Sandeep Gawade

काळा पैसा भारतात आणून देशातील जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. अच्छे दिन येणार असल्यांच स्वप्न दाखवलं होतं. काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदी केली, मात्र उलट यांनीच इलेक्टोरल बाँडमधून घोटाळा केला, भाजप आणि नरेंद्र मोदी मन की बात करतात मात्र जनतेच्या मनातलं बोलंत नाहीत, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.

भाजपनं १० वर्षात काय केलं?

गेल्या १० वर्षात सोलापुरात भाजपने काहीच केले नाही. भाजप या मुद्द्यावर बोलत नाही. भाजपाविरोधात जनतेत रोष असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलीय. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी आपल्या शब्दांना धार देत भाजपवर हल्लाबोल सुरू केलाय.

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूरच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. आज काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रणिती शिंदे यांच्याबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी प्रणिती शिंदे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मानले आभार ते आशीर्वाद देण्यासाठी आलेत. ही निवडणूक जरी माझी असली तरी ही सर्वांची लढाई असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपाने काहीच केले नाही. पण भाजप त्या मुद्द्यावर बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोलापुरात पाणी नाही, मात्र भाजपला या समस्यांऐवजी दुसरेच मुद्दे उपस्थित करत आहे. भाजपाने गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही, जनतेत भाजपविरोधात रोष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन राहील कंट्रोलमध्ये अन् चेहराही करेल ग्लो, रोज नाश्त्यासोबत प्या 'ही' २ मिनिटांत बनणारी स्मूदी

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

पुण्यात अनैतिक संबंधामुळे घडला रक्तरंजित थरार; मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून आणखी एकाला ताब्यात घेतलं

Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT