Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या राजकारणाचा पारा चढला; राष्ट्रवादीच्या आमदाराने ठोकला शड्डू? शिंदे गटाच्या दाव्याचं काय?

Lok Sabha Election 2024 : महायुतीचा नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचा या जागेवर दावा कायम असताना आता सिन्ररचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढवणार असल्याचं मोठ विधान केलं आहे.

Sandeep Gawade

महायुतीचा नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचा या जागेवर दावा कायम असताना आता सिन्ररचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढवणार असल्याचं मोठ विधान केलं आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणाचा पारा आणखी चढला आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली आहे, मात्र शिवसेना अडून बसल्यामुळे छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. आता कोकाटे यांच्या विधानामुळे शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेने ही जागा आपलीच असा दावा केला. मात्र, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही भाजपचा उमेदवार देण्याचा आग्रह धरला आहे. मध्यतही ही जागा अजित गवार गटाकडे गेली होती आणि  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं उमेदवारीसाठी नाव पुढे आलं होतं. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी नाशिकमधून माघार घेतली.

नाशिकच्या जागेसाठी गुरुवारी (ता. २५) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) नेत्यांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार गटाने महायुतीला नवा प्रस्ताव दिला आहे. छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून अजित पवार गटाने महायुतीकडे दोन उमेदवारांची नावे सूचवली आहे. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे.

माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा प्रस्ताव अजित पवार गटाने महायुतीला दिला आहे. नाशिकची जागा आम्हालाच मिळायला हवी, आमच्याकडे ताकतीचे उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी निवडणुक लढण्यासंदर्भात मोठ विधान केलं आहे. त्यामुळे नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT