Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार जमिनीवर; उमेदवारांच्या कृतीमागचं कारण काय?

Lok Sabha Election : महाविकास आघाडीनं पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. पण ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होती ते उमेदवार स्टेजवर न बसता खाली जमिनीवर जाऊन बसले. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्यात.

Sandeep Gawade

महाविकास आघाडीनं पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. पण ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होती ते उमेदवार स्टेजवर न बसता खाली जमिनीवर जाऊन बसले. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्यात. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रविंद्र धंगेकरांनी नेमकं असं का केलं. पाहुयात, या रिपोर्टमधून.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जातंय. पुण्यात मविआचे उमेदवार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशा कार्यक्रमात उमेदवारांसाठी व्यासपीठावर आसनाची खास व्यवस्था असते. मात्र पुण्यातील मविआच्या सभेत वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

पाहिलंत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रविंद्र धंगेकर कसे स्टेजसमोर बसलेत. खरं तर हे तिन्ही उमेदवार स्टेजवर असायला हवे होते. मात्र स्टेजसमोरील रस्त्यावर बसून त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अर्थात त्यामागचं कारणही तसंच होतं. महाविकास आघाडीच्या सभेला जी जागा देण्यात आली तीच मुळी लहान होती. स्टेज छोटं असल्यामुळे उमेदवारांनी बसायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला, मग काय या उमेदवारांनी थेट स्टेजसमोरच ठाण मांडलं आणि मतदारांच्या मनात आपली छबी उमटवण्याचा प्रयत्न केला.

निवडणूक प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या नामी शक्कल लढवतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही स्टंटही केले जातात. आता जमिनीवर बसून आपणही जमिनीवरचे कार्यकर्ते असल्याचा सिम्बॉलिक प्रयत्न मविआनं केला तर नाही ना, असाही प्रश्न आहे. मात्र या जमिनीवरच्या नेत्यांना लोकसभेत स्थान मिळणार की जमिनीवरच बसवलं जाणार, हे आता पुण्यातली जनताच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT