Sushma Andhare Emotional  Saam Tv
लोकसभा २०२४

Sushma Andhare: ठाकरेंसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, निकाल मनासारखा आल्यानंतर सुषमा अंधारे कॅमेऱ्यासमोरच रडल्या!, VIDEO

Sushma Andhare Emotional : राज्यात महाविकास आघाडीनेचे अनेक उमेदवार हे आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना देखील चांगली मतं मिळाली आहेत. आपल्या उमेदवारांचा विजय होणार हे पाहता सुषमा अंधारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला.

Priya More

लोकसभा निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीसोबतच ठाकरे गटाला खूप चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. आजचा निकाल म्हणजे महाविकास आघाडीसाठी खूपच आनंदाचा क्षण मानला जात आहे. कारण महाविकास आघाडीचे उमेदवार हे बऱ्याच ठिकाणी आघाडीवर आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाने खूप संघर्ष केला. त्यानंतर त्यांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.

महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष करत आहेत. सुषमा अंधारे यांनी देखील आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले.

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 'या गुलालाच्या साक्षीने सांगते की हा निकाल बाप तो बाप होता है हे सांगणारा आहे. या निकालाने सिद्ध केले की कोण आता म्हणू शकणार नाही आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुखांना जे मिळाले ते आयते नाही. आम्ही रांगेतून उभे राहतो. कितीही फोडाफोडी केली आणि काहीही केले तरी ठाकरे आणि मातोश्री यांचे आणि महाराष्ट्राचे नाते घनिष्ठ आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.'

तसंच, 'शिवसेना संतप नसते. देवेंद्रजी तुम्ही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना संपत नाही. शिवसेना ताकदीने उभी राहते.', असे म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदारार टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना गुलाल लावत जल्लोष केला. त्याचसोबत त्यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत फुगड्या देखील घातल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

युद्ध सुरुच राहणार, ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच, इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा

Kharat Case : वासनांध खरातचा कांदा घोटाळ्यातही हात, शेतकऱ्यांच्या घामावरही डल्ला, नाफेडच्या कांदा खरेदीत लागेबांधे

बजरंगाची कमाल...अन् जेवणाच्या पंगतीत वानर सेनेची धम्माल

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT