लोकसभा २०२४

Lok sabha Election: दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मराठवाडा-विदर्भातील तब्बल 'इतक्या' उमेदवारांनी दाखल केला अर्ज

Lok sabha Election: दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रुपाली बडवे, मुंबई)

Lok sabha Election Candidate Nomination:

राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले. (Latest News)

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.

शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल,नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येतील.

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणं पडेल महागात

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT