Loksabha Election Yandex
लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha : प्रहार जनशक्ती महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता; ६ एप्रिलला करणार उमेदवाराची घोषणा

Loksabha Election : राज्यातील महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. महायुतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष युतीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सीमा दाते, अमरावती)

Maharashtra Amravati Loksabha Election Bacchu kadu :

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशात प्रहार जनशक्ती महायुतीत बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झालाय. प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा इच्छुक आहेत. (Latest News)

अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झालाय. या जागेवरून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढायची आहे. तीच इच्छा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. यामुळे मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय.

नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नसल्याचं, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असं वाटतंय”, असंही बच्चू कडू यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हणाले होते. आता थेट उमेदवार घोषित करणार आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकर्सची पसंती, नाशिकमधील 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Bigg Boss 19-Pranit More : मालतीसोबतच्या भांडणावर प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT