Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; मोठा नेता लागला भाजपच्या गळाला

Lok Sabha Election 2024 : लोकसभा जागा वाटपात काँग्रेसचे किरपान यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज असलेल्या नामदेव उसेंडी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे मोठ्यासंख्येने पक्षप्रवेश होताना दिसतायेत. दरम्यान गडचिरोलीमध्ये काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. लोकसभा जागा वाटपात काँग्रेसचे किरपान यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज असलेल्या नामदेव उसेंडी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि बंटी भांगडिया यांच्या शिष्टाईला यश आल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत आहेत. काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत होतो. नेमणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी काँग्रेस पक्षाच्या संघटनाचं काम केलं. काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली - चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती. स्थानिक व राज्य पातळीवरचं माझं काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक व राज्य पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिल्यांची खंत नामदेव उसंडी यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

Chanakya Niti : एखाद्याचं हृदय जिंकायचंय? वाचा चाणक्यांची ही 4 गुपितं

SCROLL FOR NEXT