लोकसभा २०२४

Maharashtra Election: नाशिकमध्ये भुजबळांनी उमेदवारीचा दावा सोडला; पण भाजपच्या दाव्यानं पेच वाढला

छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातला उमेदवारीचा दावा सोडला. मात्र नाशिकचा पेच सुटला तर नाहीच आणखी वाढला आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसेंनी प्रचार सुरु केला असला तरी अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. भाजप नेत्यांनी गोडसेंना विरोध केला आहे. पाहूया एक रिपोर्ट...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार असे वाटत होतं. मात्र तसं न होता तिढा वाढतच चालला आहे. आता या जागेवर भाजपने पुन्हा एकदा दावेदारी केली आहेच; परंतु अजित पवार गटानेदेखील दावेदारी कायम ठेवल्याने उमेदवाराबाबत निर्णय कधी होणार, असा प्रश्न आहे. दरम्यान, हेमंत गोडसेंची उमेदवारी फायनल होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी साम टीव्हीला बोलताना दिलीय.

दरम्यान गोडसे यांच्यासंदर्भात भाजप अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते. नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. मनपामध्येही भाजपची सत्ता होती. त्यामुळं भाजपला जागा देण्याची मागणी सातत्यानं होतेय. विद्यमान आमदारही निवडणूक लढण्यासाठी तयार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाशिक, ठाणे पैकी एक जागा भाजपला द्या, असा आग्रह धरला जातोय. तर दुसरीकडे अजित पवार गटही उमेदवारीवरुन ठाम आहे. भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता निवृत्ती अरिगळे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचीही निवडणूक लढण्याची तयारी सुरु झाली आहे.

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी महिनादेखील राहिलेला नाही. भुजबळांनी दावा सोडून तीन दिवस होत आले आहेत. मात्र तरीही नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला हातातून जाणार की शिंदे सेना शेवटच्या क्षणी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT