Maharashtra Election Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम, छगन भुजबळ ३ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून

Mahayuti Seat Sharing Suspense Nashik: महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. अजून या जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या ( Nashik Lok Sabha Constituency) जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. बोरस्ते, गोडसेंनी मुंबई वारी केली आहे. मात्र, नाशिकच्या जागेचा निर्णय अजून झालाच नसल्याचं समोर येत आहे. अजून या जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला (Maharashtra Election) नाही.

दुसरीकडे छगन भुजबळ देखील मागील ३ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिकच्या जागेचा निर्णय होत नसल्यामुळे महायुतीतील इच्छुकांची प्रतीक्षा कायम (Maharashtra Politics) आहे. नाशिकच्या जागेबाबत धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. अजून पुढील काही दिवस नाशिकच्या जागेचा निर्णय नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराचा धडाका लावलेला आहे, तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Mahayuti Seat Sharing Nashik) महायुतीत हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम आहेत, जर आता भाजपही या जागेसाठी जोर लावत असल्याचं दिसत आहे.

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचंही नाव पुढं येत आहे. तर शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे (Mahayuti Seat Sharing) यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम असल्याचं चित्र दिसतंय.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू (Lok Sabha) आहे. ही जागा कोणाला जाणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नाशिकमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. १९ एप्रिलपासून निवडणूकांची सुरूवात होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात (Lok Sabha 2024) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Kurkure Momos Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल कुरकुरे मोमोज कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

SCROLL FOR NEXT