Hemant Godase Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Politics: महायुतीच्या नाशिकच्या जागेचा तिढा सुटला? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य

Nashik Lok Sabha Constituency: महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा कायम आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंनी नाशिकची जागा (Nashik Politics) शिवसेनेलाच मिळणार, असं वक्तव्य केलं आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचं गोडसेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी २ दिवसांत उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं हेमंत गोडसेंनी (Hemant Godase) माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा कायम आहे. गोडसे म्हणाले की, अजय बोरस्ते यांनी देखील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मला उमेदवारी (Nashik Lok Sabha Constituency) द्यावी, हे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मित्र पक्षांचा दावा असला तरी जागा विद्यमान खासदार असलेल्या शिवसेनेलाच सुटेल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा भेट घेतली होती. छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून शिंदे गटाचा मार्ग (Lok Sabha Election) मोकळा झाला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, नशिकमधून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु येत्या दोन दिवसात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात (Maharashtra Election) आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रात्री उशिरा गोडसे नाशिकमध्ये दाखल झाले होते.

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, यांच्यासोबतच अजय बोरस्ते देखील आग्रही (Maharashtra Politics) होते. परंतु छगन भुजबळ यांनी माघार घेत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये जाहिरपणे सांगितलं आहे. परंतु आता छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचाराचा धडाका सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार (Mahayuti Seat Sharing) जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आता नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, असं वक्तव्य हेमंत गोडसेंनी केलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

SCROLL FOR NEXT