Mahadev Jankar Saam Tv
लोकसभा २०२४

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

Parbhani Loksabha Election : आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढायचं नाही. मी पक्ष काढलाय माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचंय असं महादेव जानकर म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही. काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलंय. महादेव जानकरंना महायुतीकडून परभणीतून उमेदवारी देण्यात आलीय, अशात त्यांनी असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, परभणीतून आपणच निवडून येईल. मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून ७० टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही जानकरांनी व्यक्त केलाय. जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे महादेव जानकरांची लढत संजय जाधव यांच्याशी आहे.

बारामती शहराने २०१४ साली मला जरा अजून प्रेम मिळालं असतं तर मी पवारांना हरवलं असतं. मागीलवेळी तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचलं नव्हतं, वेळही मिळाला नव्हता. मला अनेकजण म्हणत होते की, कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलंय, आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढायचं नाही. मी पक्ष काढलाय माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेन असं जानकर म्हणालेत.

दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करतोय असं महादेव जानकर म्हणाले. मागील वेळी बारामतीच्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं की कमळावर लढ, पण मी त्याला नकार दिला होता असं ते म्हणाले. मात्र आता स्वतःच्या पक्षाच्या चिन्हवर मी दिल्लीत जाणार असल्याचा विश्वास जानकरांनी यावेळी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT