Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

Ranjitsinh Naik Nimbalkar Vs Dhairyashil Mohite Patil: निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपाशी गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खाणला आहे, असा घणाघात त्यांनी केला. पंढपुरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांसह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भारत नागणे

पंढरपूर|ता. ५ मे २०२४

माढा लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपाशी गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खाणला आहे, असा घणाघात त्यांनी केला. पंढपुरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांसह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर?

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आज देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मी आव्हान दिले होते त्यांनी ते आव्हान स्वीकारले नाही. त्यामुळे मी अशा लुग्यांसुगाचे आव्हान मानत नाही, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच "मोहिते पाटील ज्या पक्षात राहतात त्या पक्षाशी ते नेहमी गद्दारी करतात. उद्या ते पवारांना सोडून मायावतींच्या पक्षात देखील जातील. ग्रामपंचायतीला पडलेले मोहिते पाटील उद्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर नवल वाटायला नको," असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी सभेत बोलतानाही रणजितसिंह निंबाळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. "शरद पवार अनेकांच्या भावनांशी खेळले, त्याच प्रमाणे अभिजित पाटील यांच्या भावनांशी पवार खेळले आणि त्यांना राष्ट्रवादीत इच्छा नसताना प्रवेश करायला लावला. विठ्ठल कारखान्याचे 5 .50 कोटी रूपये मोहिते पाटील यांनी दिले नाहीत," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद

कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

Chiffon Saree: या सणासुदीला ट्राय करा बजेट फ्रेंडली शिफॉन साडी; मिळेल क्लासी आणि ग्लॅमरस लूक

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT