dhaval singh mohite patils support to ranjeetsinha naik nimbalkar Saam Tv
लोकसभा २०२४

Madha Loksabha Election: देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी, धवलसिंह मोहिते पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

Dhaval Singh Mohite Patils Support To Ranjeetsinha Naik Nimbalkar: माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

भारत नागणे, पंढरपूर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार (Madha Loksabha Constituency) संघ हा पश्चिम महाराष्ट्रामधील महत्वाचा मतदार संघ आहे. या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे.

या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये माढ्यामध्ये भाजपची ताकद आणखी वाढली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माढा लोकसभा मतदरसंघाकडे चांगलेच लक्ष आहे. या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पुतण्या आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना आपल्याकडे खेचलं आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली.

धैर्यशील मोहिते पाटील यांची दहशत संपवण्यासाठी आपण भाजपाला पाठींबा देत असल्याचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक खेळी करण्यात यश आले आहे. आता काँग्रेसच्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे हा महाविकास आघाडी आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्यांवर धडपशाही, दादागिरी कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा इंडिया आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज विरोधकांना दिला. 'तुमच्या सुख दुःखात मी कायम सोबत राहील.' असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी माण तालुक्यातील जनतेला दिला. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची दहिवडी येथे सभा झाला. या सभेतून धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला.

दरम्यान, माढ्यामध्ये महायुतीची ताकद वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेत माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. हा उत्तम जानकर यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT